प्राण्यांचे वर्तन
प्राणी स्वतंत्रपणे किंवा समूहात असताना ज्या निरनिराळ्या हालचाली किंवा कामे करतात त्यांना प्राण्यांचे वर्तन असे म्हणतात. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या तऱ्हेची तंत्रे वापरण्यात आली असून प्राण्यांची वाढ, रचना, वेगवेगळ्या शरीरक्रिया, भोवतालची परिस्थिती आणि आनुवंशिकता यांच्या संदर्भात प्राणी कशा तऱ्हेने वर्तन करतात याचाही अभ्यास करण्यात आला आहे.